कणकवली : महामार्गावरील अनधिकृत मिडलकट बंद करण्याचे निर्देश

लसीकरणासाठी जात असलेल्‍या दोन आरोग्‍य सेवकांचा जानवली मिडलकटच्या ठिकाणी अपघात झाला. यात एकाची प्रकृती गंभीर आहे.
महामार्गावरील अनधिकृत मिडलकट बंद करण्याचे निर्देश
महामार्गावरील अनधिकृत मिडलकट बंद करण्याचे निर्देशsakal
Updated on

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील ते खारेपाटण या दरम्‍यानचे सर्व अनधिकृत मिडलकट बंद करा असे निर्देश महामार्ग पोलिस विभागाने हायवेचे ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणला दिले होते. मात्र ‘‘मागणी तसा पुरवठा’’ या प्रमाणे जागोजागी असलेले मिडलकट ओलांडताना सतत अपघात होत असून काहींना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत. आज लसीकरणासाठी जात असलेल्‍या दोन आरोग्‍य सेवकांचा जानवली मिडलकटच्या ठिकाणी अपघात झाला. यात एकाची प्रकृती गंभीर आहे.

महामार्ग चौपदरीकरणात राजकीय नेतेमंडळी, स्‍थानिक पुढारी तसेच तेथील जनतेच्या आग्राहास्तव मिडलकट ठेवण्यात आले आहेत. या मिडलकटवरून जाणारी वाहने अचानक रस्त्यावर येत असल्‍याने ती भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना धडकत आहेत. यामध्ये जीवित हानीही होत आहे. गेल्‍या वर्षभरात असे मिडलकट ओलांडताना अनेकांना बळी गेल्‍याने सर्व अनधिकृत मिडलकट बंद करा असे पत्र महामार्ग पोलिस विभागाने राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्‍या दोन्ही ठेकेदारांना दिले होते. मात्र या पत्राचीही महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपन्यांनी दखल घेतलेली नाही. त्‍यामुळे महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत.

महामार्गावरील अनधिकृत मिडलकट बंद करण्याचे निर्देश
वैभववाडी : तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस

दोन महिन्यापूर्वी जानवली येथील पेट्रोल पंपासमोरील अनधिकृत मिडलकट ओलांडत असताना दुचाकीला कारने उडवले होते. यात नाटळ येथील एका डॉक्‍टरांचा बळी गेला होता. त्‍यानंतर आज जानवली ग्रामपंचायत समोरील अनधिकृत मिडलकट ओलांडून लसीकरणासाठी जात असलेले आरोग्‍य सेवक यांच्या दुचाकीला धडक देऊन कार चालक फरार झाला. यात जाधव यांच्यासह त्‍यांच्यादुचाकीवर बसलेल्या आरोग्‍यसेविका नीलम गवाणकर ह्या जखमी झाल्या आहेत.

महामार्ग विभागाच्या निर्देशानुसार प्रत्‍येक चार किलोमिटर नंतर मिडलकट देता येतो. मात्र कणकवली शहरालगतच्या जानवली मारूती मंदिर ते साकेडी तिठा बॉक्‍सवेल या दरम्‍यानच्या चार किलोमिटर अंतरामध्ये तब्‍बल दहा ठिकाणी अनधिकृत मिडलकट आहेत. हे सर्व मिडलकट अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. यापूर्वी जानवली बौद्धवाडी येथील अपघातात एक दुचाकी स्वार ठार झाला होता. तर पेट्रोल पंपासमोरील मिडलकटवरील अपघातात एका डॉक्‍टरांचे निधन झाले होते. त्‍यानंतर महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता सलीम शेख यांनी सर्व अनधिकृत मिडलकट बंद करण्याचे निर्देश हायवे ठेकेदार कंपनीला दिले होते. मात्र ते बंद करण्याची कार्यवाही अजूनही झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration
Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
Marathi News Esakal
www.esakal.com