esakal | Malvan: मासेमारी साहित्य ठेवण्याच्या गोडाऊनला अचानक आग
sakal

बोलून बातमी शोधा

गोडाऊनला अचानक आग

मालवण : मासेमारी साहित्य ठेवण्याच्या गोडाऊनला अचानक आग

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण : शहरातील दांडी येथील मत्स्य व्यावसायिक रुजारिओ पिंटो यांच्या मासेमारी साहित्य ठेवण्याच्या गोडाऊनला आज सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याचे दिसताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र यात जाळ्या तसेच अन्य साहित्य जळून सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

श्री. पिंटो यांचे दांडी समुद्रकिनारी मासेमारी साहित्य ठेवण्याचे गोडाऊन आहे. आज सकाळी अचानक या गोडाऊनला आग लागली. आग लागल्याचे दिसताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरवात केली. या घटनेची माहिती पालिकेला देण्यात आली. मात्र पालिकेकडे अग्निशमन बंब नसल्याने स्थानिक नागरिकांना पाण्याच्या तसेच अन्य साहित्यांचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवावे लागले.

हेही वाचा: सावंतवाडी : बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी लावले हाकलून

आग लागल्याची माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी स्थानिक लोकप्रतिनिधीही घटनास्थळी दाखल झाले होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या आगीत गोडाऊनमधील मासेमारीच्या जाळ्या, बॅरल तसेच छप्परसह अन्य साहित्य जळून सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.

loading image
go to top