सावंतवाडी : बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी लावले हाकलून

दोन दिवसात या भागातील सर्व चेंबर व पोल न बदलल्यास आम्ही शांत बसणार नाही
बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी लावले हाकलून
बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी लावले हाकलूनsakal

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील बीएसएनएल चेंबरच्या भगदाड प्रश्नी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या बीएसएनएल अधिकाऱ्याची स्थानिकांशी बाचाबाची झाल्याने त्यांना संतप्त नागरिकांनी हाकलून लावले. दोन दिवसात या भागातील सर्व चेंबर व पोल न बदलल्यास आम्ही शांत बसणार नाही, अशा इशाराच तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला.

यावेळी बीएसएनएलचे मुख्य प्रबंधक विक्रांत देशमुख यांनी दोन दिवसात सर्व प्रश्न मार्गी लावू, असा शब्द उपस्थितांना दिला. यावेळी देवेंद्र टेंमकर, बाळ चोणकर, नंदू गावडे, अमेय मोघे, गणेश गिरी, प्रदीप सुकी, बाप्पा चव्हाण, बंड्या हर्णे, इफ्तिकार राजगुरू, डॉ. लेले, आदी माठेवाडावासिय उपस्थित होते.

बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी लावले हाकलून
पिंपरी : शहरातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे गुरुवारपासून खुली

माठेवाडा भागीरथी व आत्मेश्वर मंदीर रोडवरील बीएएसएन केबलच्या चेंबरला मोठे भगदाड पडले असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींने काही दिवसांपूर्वी आक्रमक पवित्रा घेत बीएएसएनएलचे मुख्य प्रबंधक देशमुख यांना या परिस्थितीची गंभीरता लक्षात आणून दिली होती; मात्र दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना जाब विचारत कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थितांनी केला; मात्र स्वतःची जबाबदारी सावंतवाडी पालिकेवर ढकलू पाहणाऱ्यास धारेवर धरत बाचाबाची करणाऱ्या सबडिव्हीजन इंजिनिअरला नागरिकांनी हाकलवून लावले. यानंतर मुख्य प्रबंधक देशमुख यांनी घटनास्थळी येत वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यांनाही धारेवर धरत तातडीने उपाययोजना करा, अन्यथा रस्ता बंद करण्याचा इशारा देताच दोन दिवसांत येथील सर्व चेंबर, नादुरुस्त पोल दुरुस्त करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला; मात्र दोन दिवसांत काम न झाल्यास शांत बसणार नसल्याचा इशारा नागरिकांनी दिला. मुख्य प्रबंधकांनी दिलेल्या शब्दानंतर तंग झालेले वातावरण शांत झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com