Kokan: फूट पाडाल तर फिरकू देणार नाही : आमदार राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नितेश राणे

फूट पाडाल तर फिरकू देणार नाही : आमदार राणे

सावंतवाडी ; राज्याने एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावून एसटी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा घडवावी आणि एसटी महामंडळ विलीनीकरणाचा निर्णय घ्यावा, भाजप यासाठी सरकारवर दबाव आणत आहे, असे आमदार नितेश राणे यांनी येथे आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना सांगितले. जिल्हा विभाग नियंत्रक हे कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही आमदार राणे यांनी यावेळी दिला.

येथील एसटी आगारासमोर आंदोलनस्थळी आमदार राणे यांनी काल (ता.९) सायंकाळी उशिरा भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, तालुकाध्यक्ष महेश धुरी, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी सभापती मनिषा धुरी, गुरुनाथ पेडणेकर, मधुकर देसाई, अँड परिमल नाईक तसेच कर्मचारी रामा वाडकर, मंगेश नानचे, अजित कदम, सिंधू गायकवाड, नीलिमा सावंत, तुळशीदास पवार, अरुण पवार, राजू आजगावकर, सह्याद्री सातार्डेकर, विलास सातार्डेकर, यु. डी. धरणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

राणे म्हणाले, ‘‘एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा सक्रिय पाठिंबा आहे. न्यायासाठी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नये. कर्मचाऱ्यांनी एकजुट कायम ठेवावी. सरकार घाबरले आहे. ते कर्मचाऱ्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांच्या एकजुटीने न्याय मिळवून देण्यासाठी भाजप आवाज उठवेल. आज कर्मचारी आत्महत्या करत असताना परिवहन मंत्र्यांना झोप कशी काय येते? एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला मंत्री परब जबाबदार असून हे आत्महत्या नाही तर सरकारने घडवलेली हत्या आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक व्हावी. कर्मचाऱ्यांत फुट पडण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही.’’

शंभर कोटी वसुलीला कसा वेळ?

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आमदार राणे यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘‘अनिल परब यांना शंभर कोटी वसुलीसाठी वेळ मिळतो; मात्र आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी वेळ मिळत नाही. आता महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या खिशात वेळेत पगार टाकावा.’’

loading image
go to top