येत्या सोमवारी ३१ मार्च रोजी गाडी क्रमांक १०१०७ मडगाव जंक्शन ते मंगळुरू सेंट्रल मेमू एक्सप्रेस मडगाव जंक्शन ते इन्नाजे सेक्शन दरम्यान ५० मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील (Kokan Railway Route) पदुबिद्री स्टेशनवरील पॉइंट क्रमांक १०३ आणि ११६ बदलण्यासाठी एनआय मेगा ब्लॉक (Mega Block) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (ता.२८) ते सोमवारी (ता. ३१) असा हा चार दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.