भुईबावड्यात तीन मंदिरे फोडली; घंटासह हजारोंच्या वस्तू लंपास

सीसीटीव्ही फुटेजच्या आधार घेवून पोलिसांनी तपास सुरू केला असून महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आल्याचे समजते.
thief
thiefSakal

वैभववाडी : भुईबावडा येथील तीन मंदिरे अज्ञात चोरट्यांनी काल (ता.४) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास फोडुन घंटासह हजारो रूपये किमंतीच्या वस्तू लंपास (Loot) केल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधार घेवून पोलिसांनी तपास सुरू केला असून महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आल्याचे समजते. भरवस्तीत झालेल्या या चोरीने परिसरात खळबळ माजली आहे. (Kokan Crime News)

भुईबावडा गावात श्री देव रवळनाथ, श्री देव गांगेश्वर आणि श्री देव विठ्ठल मंदिरे आहेत. यातील दोन मंदिरे ही बाजारपेठेत आणि वस्तीत आहेत. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुजारी सुभाष यशवंत गुरव हे मंदिरात गेले असताना त्यांना मंदिरांचा दरवाजा उघडा दिसला. याशिवाय अन्य खोल्यांचे दरवाजे देखील उघडे दिसून आले. फंडपेटी देखील फोडल्याची दिसून आली. त्यामुळे त्यांनी जेवण बनविण्याचे साहित्य असलेली खोली जावुन पाहिली असता त्या खोलीतील साहित्यही चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

thief
इंदापूर : पोटच्याच मुलाने केली मातेची निर्घृण हत्या

त्यामुळे त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. त्याच वेळी बाजारपेठेत वस्तीत असलेली श्री देव गांगेश्वर आणि श्री देव विठ्ठल या दोनही मंदिरामध्ये चोरी झाल्याचे पुढे आले. त्यामुळे ही माहिती पोलीसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, मारूती साखरे, अभिजीत तावडे, राहुल तळसकर, सुनील पडेलकर आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रवळनाथ मंदिरात जावुन पाहीले असता मंदिरातील बहुतांशी वस्तू चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

रवळनाथ मंदिरातील तीन घंटा, पुजेचे सर्व साहित्य, ४० स्टीलची ताट, २५० प्लास्टीक थाळ्या, ४ पितळी टोप, तीन समई, एक मिक्सर याशिवाय मंदिरातील हंडा, कळश्या, तांब्या, पेले, वगराई, स्टील टाक्या, गॅस शेगडी आदी २० हजाराहून अधिक किंमतीच्या वस्तू चोरीस गेल्या. गांगेश्वर मंदिरातील २१ घंटा आणि इतर साहित्य तर श्री देव विठ्ठल मंदिरातील पाच घंटा चोरीस गेल्या. हजारो रूपये किंमतीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या.

thief
सिंधुदुर्गात आठवीपर्यंतच्या शाळा बंद

भरवस्तीतील मंदीरे चोरट्यांनी फोडल्यामुळे गावात खळबळ माजली आहे. पोलीसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भुईबावडा बाजारपेठेत रात्री येऱ्याझाऱ्या घालणाऱ्या एका गाडीवर पोलीसांचा संशय असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. या गाडीचा शोध पोलीसांनी सुरू केला आहे. ती गाडी रात्री दीड दोन वाजण्याच्या सुमारास नेमकी का फिरत होती? याचा उलगडा झाल्यानंतर पोलीसांच्या हाती ठोस धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com