esakal | Kokan: वाहतूक दरवाढीबाबत डंपर चालक मालक संघटनेची बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

डंपर चालक मालक संघटनेची बैठक

दोडामार्ग : वाहतूक दरवाढीबाबत डंपर चालक मालक संघटनेची बैठक

sakal_logo
By
प्रभाकर धुरी

दोडामार्ग : वाहतूक दरवाढीबाबतचा निर्णय घेण्यासाठी डंपर चालक मालक संघटनेने गौण खनिज व्यावसायिक आणि वाहतूक ठेकेदार यांना सोमवारपर्यंतची (ता.४) डेडलाईन दिली आहे. डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेवून वाहतूक दरवाढ करावी आणि दरवाढ न करता गौणखनिज (खडी) वाहतूक सुरू केल्यास महसूल आणि आरटीओ विभागाला त्या वाहनांवर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बांदा येथील श्री स्वामी समर्थ हॉलमध्ये बैठक झाली.

बैठकीला श्री साई समर्थ डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष शाम धुरी, उपाध्यक्ष तेजस सावंत, सचिव विजय देसाई, प्रशांत पांगम, सुशांत पांगम, उमेश पेडणेकर, बंड्या खान, निखील मयेकर, मंदार महाजन, गोव्यातील डंपर संघटनेचे पदाधिकारी, अन्य डंपर मालक तसेच वाहतूक ठेकेदारांच्यावतीने भाऊ नाटेकर, साई राणे, झेवियर फर्नाडीस, ओम ट्रान्सपोर्ट व सिक्वेरा ट्रान्सपोर्टच्यावतीने श्री. राऊळ उपस्थित होते. गोवा आणि बांदा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बैठक आयोजित केली होती. संघटनेचे निवेदन श्री. राऊळ यांनी स्वीकारले.

हेही वाचा: नसरापूर : कंपनीने १६ कामगारांना कामावरुन काढले; मनसेचे आंदोलन

संघटनेने केलेल्या मागण्या अशा: डंपर भाडे डिझेल दराच्या पटीत असावे. त्याचा रेशो पन्नास पन्नास टक्के असावा. वाहतूक खर्च (डिझेल वैगरे) दोन हजार असेल तर मालकाला किमान दोन हजार रुपये शिल्लक भाडे मिळावे. बिलातून फक्त टीडीएस कपात करावा. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला गाडी मालकाला स्टेटमेंट मिळावे. गाडी भाड्याची रक्कम चाळीस ते पंचेचाळीस दिवसात मालकाच्या खात्यात जमा व्हावी. साडेबारा टनाप्रमाणेच मालाची वाहतूक व्हावी. वाहतूक रुटवरील व जवळपासच्या गाड्या चालावाव्यात. सर्वांना समान ट्रीप मिळाव्यात. सर्वांचा वाहतूक दर समान असावा. दरवाढ होईपर्यंत गौणखनिज वाहतूक बंद ठेवावी.

loading image
go to top