नसरापूर : कंपनीने १६ कामगारांना कामावरुन काढले; मनसेचे आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रुपाली ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या गेट वर धरणे आंदोलन करण्यात आले.
मनसेचे आंदोलन
मनसेचे आंदोलनsakal

नसरापूर : वरवे बुद्रुक येथील बहुराष्ट्रीय कंपनी एसेल इंडिया प्रा. लिमिटेड मधुन १६ कामगारांना जानेवारी महिन्यात अचानक कोणतेही कारण न देता कामावरुन काढले कामगार न्यायालयाने या प्रक्रियेला स्थगिती दिली असताना देखिल न्यायालयाच्या निर्णय धुडकावत कामगारांना कामावर न घेणारया व्यवस्थापनाच्या विरोधात पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रुपाली ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या गेट वर धरणे आंदोलन करण्यात आले.

एसेल इंडिया कंपनीने जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये कोणतेही कारण न देता कंपनी मधील १४ कायमस्वरुपी व २ प्रशिक्षणार्थी कामगारांना तातडीने कामावरुन काढले असे अचानक काडल्याने कामगारांना मोठा धक्का बसला या बाबत कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यसाठी गेले असता व्यवस्थापनाने कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला या झालेल्या अन्याया बाबत कामगारांनी मनसेच्या पुणे येथील नेत्या रुपाली ठोंबरे यांना या बाबत लक्ष घालण्याची विनंती केली त्यांनी देखिल या बाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने या कामगारांसाठी शेवटी कामगार न्यायालयात दाद मागण्याचे ठरवण्यात आले त्या नुसार कामगार न्यायालयात एप्रिल २०२१ मध्ये तक्रार दाखल करताच न्यायालयाने या प्रक्रियेला जैसे थे असा आदेश देत कामगारांना कामावरुन कमी करण्यास स्टे दिला होता मात्र व्यवस्थापनाने न्यायालयाचा आदेश देखिल न मानता या कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला आहे.

मनसेचे आंदोलन
उत्तर प्रदेशात भाजपा ३२५ ते ३५० जागा जिंकेल - योगी आदित्यनाथ

या बाबत मनसेच्या रुपाली ठोंबरे यानी माहीती देताना सांगितले कि, बेकायदेशीररीत्या कामावरुन काढुन टाकण्याच्या कृती बाबत मनसे कडुन व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी ता.२८ रोजी कंपनीच्या गेट वर मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले शांततेत करण्यात येत असलेल्या या आंदोलनाला चिरडण्यासाठी व्यवस्थापना कडुन पोलिसांना पाचारण करण्यात आले होते मात्र कंपनी व्यवस्थापनच न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असल्या बाबत आमच तक्रार आहे कोणतेही कारण न देता कंपनी कामगारांना कामावरुन काढु शकत नाही या कामगारांना कोणत्याही अटी शिवाय त्वरीत कामावर घ्यावे अशी आमची मागणी आहे व त्यासाठी आमचा लढा चालु राहणार आहे.

कामगारांचे वकील अँड जतीन अढाव यांनी या बाबत माहीत देताना सांगितले कि,कोणत्याही कंपनीला कामगार कमी करण्यासाठी एक प्रक्रिया आहे यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते

एसेल कंपनी मध्ये १०० पेक्षा जास्त कामगार आहेत या कामगारांची जेष्ठता यादी प्रसिध्द करुन सगळ्यात शेवट लागलेल्या कामगारांना काढता येते परंतु या कंपनीने कोणतीही कायदेशीर बाबीची पुर्तता न करता या कामगारांना काढले आहे हे आम्ही कामगार न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यावर न्यायालयाने आमचे म्हणणे मान्य करुन जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते ते देखिल कंपनीने मानले नाहीत या बाबत आम्ही न्यायालयाचा अवमान झाल्या बद्दल नव्याने तक्रार दाखल केली आहे.

मनसेचे आंदोलन
अतिवृष्टीमुळे CET देऊ न शकलेल्यांना पुन्हा संधी: उदय सामंत

कंपनीच्या मानव संसांधन विकास विभागाच्या व्यवस्थापिका स्नेहा वडके यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता ही बाब न्यायप्रविष्ठ आहे त्याची सुनावणी चालु आहे न्यायालय देईल तो निर्णय कंपनीस मान्य राहील असे सांगुन त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

दरम्यान कामावरुन काढलेल्या कामगारा पैकी एका कामगाराचे निधन झाले असुन या कामगाराच्या पत्नीस कामावर घेतो असे सांगुन कंपनीने सदर कामगाराच्या पत्नीस केस मागे घेण्यास सांगुन कंपनी मध्ये स्वच्छतागृह सफाईचे काम देऊन अपमानीत केले असल्याचा आरोप रुपाल ठोंबरे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com