Konkan Railway | दीर्घकाळापासून कोकण रेल्वे ठप्प; वाहतुकीचा खोळंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan Railway
दीर्घकाळापासून कोकण रेल्वे ठप्प; वाहतुकीचा खोळंबा

दीर्घकाळापासून कोकण रेल्वे ठप्प; वाहतुकीचा खोळंबा

कोकण रेल्वेची वाहतूक आज पहाटेपासून विस्कळीत झाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास रेल्वे ठप्प झाली आहे. शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेली कोकणकन्या एक्सप्रेस (KonkanKanya Express) विलवडे स्थानकात थांबली आहे. सकाळी पाच वाजल्यापासून ही रेल्वे खोळंबली आहे.

कोकण कन्या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे विलवडे रेल्वे स्थानकात कोकणकन्या एक्सप्रेस थांबली आहे. जवळपास तीन तासांपासून ही रेल्वे सेवा कोलमडली आहे. कधीपर्यंत वाहतूक पूर्ववत होईल, इंजिन दुरुस्त होईल, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तसंच इंजिनात नेमका काय बिघाड झालाय, हेही समोर आलेलं नाही.

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून शनिवारी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी ही रेल्वे सुटली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारात रत्नागिरी सोडल्यावर विलवडे स्थानकाच्या दिशेने जात असताना गाडीच्या इंजिनात बिघाड झाला. त्यानंतर विलवडे स्थानकावरच कोकणकन्या एक्सप्रेस थांबून आहे. ही ठप्प झालेली रेल्वेसेवा कधी पूर्ववत होणार, याबद्दलचं चित्र अस्पष्ट असल्याने प्रवासी चिंतेत आहे.

Web Title: Kokankanya Express Engine Breaks Down Kokan Railway

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kokanrailway
go to top