कोणी दहा रुपये दिले तर कोणी दिले पन्नास, जमा झाले हजारो...

Kondfansavane villagers help CM fund in chiplun
Kondfansavane villagers help CM fund in chiplun

चिपळूण (रत्नागिरी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकारला मदत करण्यासाठी कोेंडफणसवणे गावातील ग्रामस्थांनी वर्गणी गोळा केली. कोणी दहा, कोणी पन्नास तर कोणी शंभर रूपये दिले. एकूण 28 हजार 600 रुपये जमा झाले. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी आज तहसीलदारांकडे देण्यात आली. 


कुंभार्ली घाटाच्या पायथ्याशी डोंगराळ भागात 1300 लोकसंख्या असलेले कोंडफणसवणे गाव आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तरूणवर्ग कामधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणेसह राज्याच्या अनेक भागात आहेत. सध्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने संचारबंदी करून जिल्ह्याच्या सीमा करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार अडचणीत असल्याने कोरोना विषाणूवर उपायोजना करण्यासाठी मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड -19 या नावाने बँक खाते सुरू करण्यात आले आहे. या खात्यात जनतेने सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत येथील महाकाली देवस्थान व ग्रामस्थांच्यावतीने मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोंडफणसवणे ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फंडास मदत

सरकारला मदत करण्याच्या हेतूने गावातील नागरिकांनी स्वतःहून पैसे दिले. प्रत्येकाने आपल्यापरीने पैसे दिले. एकूण 28 हजार 600 रुपये जमा झाले. ही रक्कम आज तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्याकडे धनादेशाद्वारे देण्यात आली यावेळी गावचे सरपंच सखाराम जाधव, उपसरपंच केशव काजवे, माजी सरपंच मधुकर इंदूलकर, अनंत पवार, ग्रामसेविका सौ. रूपाली कहाणे, पोलिस पाटील रविंद्र इंदुलकर, संतोष कदम, सुनील जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी केतन कदम, कृष्णा जिंगरे, वसंत कदम, लक्ष्मण पवार, तुकाराम जाधव आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत निभावते आपली जबाबदारी

याबाबत माहिती देताना सरपंच सखाराम म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढू लागल्यानंतर त्याची लागन गावात होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने आवश्यक त्या सर्व उपायोजना करण्यात आल्या. गावची स्वच्छता, औषध फवारणी करण्यात आली. मास्क आणि साबणाचे वाटप करण्यात आले. गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शासनाकडून आलेले मोफत धान्य गावातील प्रत्येक नागरिकाला मिळावे यासाठी ग्रामकृती दलाच्या माध्यमातून प्रयत्न केले. एकूणच ग्रामपंचायतीने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्याची माहिती सरपंच सखाराम यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com