कोकणच्या बसेस मुंबईतील बेस्टच्या मदतीला  

Konkan buses to help BEST in Mumbai
Konkan buses to help BEST in Mumbai

दाभोळ : मुंबई येथील रेल्वेची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने मुंबईत प्रवासी सेवा देणार्‍या बेस्टवर आता वाहतुकीचा आलेला ताण कमी करण्यासाठी बेस्टच्या मदतीला एसटी धावून गेली आहे. मुंबईमध्ये प्रवासी वाहतूक करण्यासाठी राज्यभरातून एसटीच्या बसेस चालक, वाहक व इतर कर्मचार्‍यांसह मुंबई येथे दाखल झाल्या असून रत्नागिरी जिल्ह्यातूनही 9 एसटी आगारातून 104 बसेस मंगळवारपासून (ता. 6) मुंबई येथे रवाना होणार आहेत. 


मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वेची लोकल सेवा सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठीच धावत आहे. इतरांना कामावर जाण्यासाठी बेस्ट बसेसचाच आधार आहे. सध्यातरी लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता नसल्याने मुंबईकरांना त्यांच्या इच्छितस्थळी पोचविण्यासाठी बेस्ट व एसटी महामंडळ यांच्यात करार झाला असून या करारान्वये एसटीच्या बसेस बेस्टने भाड्याने घेतल्या आहेत. यात एसटीचे चालक, वाहक व इतर कर्मचारी एसटीनेच पुरवायचे असून रोजच्या तिकिटाचे पैसे बेस्टकडे जमा करावयाचे आहेत. एका एसटी बससाठी दोन चालक व दोन वाहक व अन्य कर्मचारी मुंबई येथे जाणार आहेत. या सर्व कर्मचार्‍यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे. 

बेस्ट बसेससारखेच प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी तसेच उतरण्यासाठी सोपे जावे यासाठी एसटीचे दरवाजे काढून या एसटी बसेस मुंबईत पाठविण्यात येणार असल्याने प्रत्येक डेपोत आता बसेसचे दरवाजे काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातून प्रत्येक आगारातून बसेस पाठविण्यात येणार असून एकूण 104 बसेस मुंबई येथे जाणार असून त्यात दापोली व देवरूख प्रत्येकी 12, खेड व चिपळूण प्रत्येकी 13, गुहागर- 10, रत्नागिरी- 19, लांजा व राजापूर प्रत्येकी 8, मंडणगड- 9 बसेसचा समावेश आहे. 7 ऑक्टोबरला 54, तर 8 ऑक्टोबरला 54 बसेस मुंबईकडे कर्मचार्‍यांसह रवाना होणार आहेत.

दापोलीतील लांब पल्ल्याच्या गाड्या बंद

मुुंबईला चांगल्या गाड्या पाठवायच्या असल्याने आता दापोली आगारातून काही लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या असून त्यात दापोली-शिर्डी बसचाही समावेश आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com