लक्झरीतून दारू घेऊन जाणाऱ्या तिघांना चिरीमिरी घेवून सोडले, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल 

video viral on social media police action to supply vine
video viral on social media police action to supply vine

वैभववाडी ; एका लक्झरी बसमधून दारू वाहतूक करणाऱ्या तीन तरूणांना करूळ तपासणी नाक्यावर चिरीमिरी घेवून सोडल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता. ५) पहाटे घडला आहे. पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे करूळ नाक्यावरील तपासणीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास करूळ तपासणी नाक्यावर पोलिस कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरू होती. याचवेळी गोव्याहून एक आरामबस तपासणी नाक्यावर आली. पोलिसांनी ही बस थांबविली आणि गाडीची झडती घेण्यास सुरूवात केली. गाडीची झडती घेत असताना एका बॅगेत चार दारूच्या बाटल्या सापडल्या. या बाटल्या नेमक्या कुणाच्या आहेत, याची विचारणा केल्यानतंर गाडीतील तीन तरूणांनी त्या आपल्या असल्याचे सांगीतले. आपण गोव्याला स्पर्धा परीक्षेसाठी गेलो होतो. परीक्षा संपवून आम्ही पुण्याला निघालो आहोत. प्रत्येकी एकच बाटली घेतली आहे, असे ते पोलिसांना सांगत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबा आता तुमच्यावर कारवाईच करतो. ही कारवाई झाली तर तुम्ही परीक्षा पास होऊन देखील काहीही उपयोग होणार नाही, अशी धमकी त्यांनी त्या तरूणांना दिली. त्यामुळे तीनही तरूण पोलिसांच्या हातापाया पडू लागले. साहेब प्रकरण वाढवू नका, अशी विनवणी करू लागले.
 
त्यानतंर त्या तरूणांना गाडीतून खाली नेण्यात आले. यावेळी त्या तीन तरूणापैकी एकाने पोलिसांना रस्त्यावरच पैसे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिस अधिक खवळले. त्यानतंर नाक्याच्या मागच्या बाजुला त्याला नेण्यात आले. त्यानतंर मात्र ते तरूण गाडीत आले. कोणतीही कारवाई न करता त्यांना पोलिसांनी सोडले.

दरम्यान, करूळ तपासणी नाक्यावर चिरीमिरी घेवून दारू वाहतूक करणाऱ्या तरूणांना सोडल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे पोलिस प्रशासनात खळबळ माजली आहे. या व्हीडिओत एका व्यक्तीकडून पोलीस कर्मचारी हातात पैसे घेत असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे करूळ नाक्यावरील तपासणी पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

  निवडणूक काळात आठवड्यात तीनदा दारू सापडली

गोव्यावरून कोल्हापूर, पुण्याला जाणाऱ्या अनेक लक्झरी बसमधून मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानतंर एका आठवड्यात या तपासणी नाक्यावर तीनदा दारू सापडली होती. परंतु त्या तुलनेत इतर वेळी दारू का सापडत नाही अशी चर्चा आहे.

सोशल मीडियावरील व्हीडिओ पाहीला. परंतु त्यामध्ये कोणतेही तथ्य वाटत नाही. त्या व्हीडिओमध्ये कुणीतरी एक व्यक्ती हस्तादोलन करताना धुरकटपणे दिसत आहे. त्याचा इतर अर्थ काढता येणार नाही. तरी त्यादिवशी नाक्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा करण्यात येईल. या प्रकाराची तथ्यता तपासून पाहीली जाईल.

-अतुल जाधव, पोलीस निरीक्षक,पोलीस ठाणे वैभववाडी 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com