Dadar Ratnagiri Passenger Train : उत्तर भारतासाठी गाड्या सुसाट, मग कोकणच्या जीवनवाहिनीला नकार का? दादर-रत्नागिरी पॅसेंजरवरून प्रवाशांचा संताप अनावर

Dadar Ratnagiri Passenger train restart latest news : मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी फेटाळली. मार्गाची क्षमता, दादर स्थानकातील सुविधा आणि मार्ग उपलब्धतेच्या अडचणींचे कारण देत निर्णय घेतल्याने कोकणी चाकरमान्यांमध्ये संताप वाढला आहे.
Dadar Ratnagiri Passenger Train

Dadar Ratnagiri Passenger Train

esakal

Updated on: 

खेड : मुंबई आणि उपनगरांमध्ये वास्तव्यास असलेल्या लाखो कोकणी चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाने फेटाळून लावली (Dadar Ratnagiri passenger train restoration demand) आहे. रेल्वेमार्गाची मर्यादित क्षमता, दादर स्थानकातील अपुऱ्या सुविधा आणि दिवा - दादरदरम्यान मार्ग उपलब्धतेतील अडचणी, अशी कारणे प्रशासनाने पुढे केली आहेत; मात्र, इतर मार्गांवर नव्या गाड्यांना हिरवा कंदील दाखवला जात असताना कोकणच्या हक्काच्या गाडीला नकार दिल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...