
मालवण, (जि. सिंधुदुर्ग) : ‘‘कोकणचा विकास महायुती सरकारच्या अजेंड्यावर आहे. या भागाला गेल्या अडीच वर्षांत झुकते माप दिले आहे. यापुढेही जेवढे देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न करू, यामध्ये पर्यटन विकासाला प्राधान्य असेल,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.