

Preserving Traditions: Raigad’s Houses Busy with Summer Food Storage (Begmi)
Sakal
पाली : भारतीय खाद्यसंस्कृतीत 'चवी'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कडक उन्हाचा तडाखा वाढू लागला की, गृहिणींना वेध लागतात ते पावसाळ्याच्या बेगमीचे. पावसाळ्यातील चार-पाच महिने तोंडी लावण्यासाठी आणि जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी उन्हाळ्यात करण्यात येणाऱ्या वाळवण आणि मसाल्यांची जंत्रीच मोठी आहे. रायगड जिल्ह्यात सध्या घराघरांतून पापड, कुरडया, सांडगे आणि विविध मसाल्यांचा सुवास दरवळत असून, ही पारंपरिक वाळवण व खाद्य संस्कृती आजही तितक्याच उत्साहात जोपासली जात असल्याचे चित्र दिसत आहे.