Konkan Mango Crisis : कोकणचा कणा असलेला आंबा संकटात; ९० टक्के मोहोर करपल्याने बागायतदार हवालदिल

Climate Change : जगप्रसिद्ध देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्यामुळे कोकणची ओळख देश-विदेशात निर्माण झाली. मात्र, यंदा बदलत्या हवामानाचा जबरदस्त फटका आंबा पिकाला बसला आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त मोहोर करपल्याने हजारो बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
Climate Change imapact on Mango

Climate Change imapact on Mango

sakal

Updated on

कोकणातील आंब्याने  देश-विदेशातील खवय्यांना भुरळ घालीत जागतिक दर्जा मिळविला. गेल्या काही वर्षांत आंबा हा कोकणच्या अर्थकारणाचा कणा बनला. मात्र, आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात बदलत्या वातावरणाचा तडाखा बसला. ९० टक्केपेक्षा अधिक मोहोराने बहरलेली झाडे पूर्णतः करपली. ही झाडे अक्षरक्षः काळवंडली असून दहा टक्केही उत्पादनाची हमी राहिलेली नाही. कुणी कर्ज तर कुणी हातउसने पैसे घेऊन लाखो रूपये बागांवर खर्च केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com