

Konkan Forest Fire Prevention Measures
esakal
पाली : सध्या राज्यासह कोकण किनारपट्टीवर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पाणी व जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. अशा गंभीर परिस्थितीत सह्याद्रीच्या डोंगररांगांसह रायगड जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागातील डोंगरदऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वणवे लागत आहेत. या वणव्यांमुळे अमूल्य वनसंपदा, फळबागा आणि नैसर्गिक गवताळ कुरणे जळून खाक होत असून, याविरोधात ठोस पावले उचलण्याची मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुजित सदाशिव बारसकर यांनी केली आहे.