कोकण रेल्वेत थरार; धावत्या रेल्वेच्या इंजिनने सोडले डबे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 जानेवारी 2019

चौकशीचे आदेश
कोंकण रेल्वेने ही घटना गंभीर घेतली आहे. तांत्रिक कारणामुळे इंजिन आणि डब्याचे कपलिंग सुटले. मात्र हे नेमके कशामुळे झाले यासंदर्भात कोंकण रेल्वेने चौकशीचे आदेश दिले असल्याचे कोकण रेल्वे विभागाचे माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले.

मुंबई : कोंकण मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल सिएसएमटी करमाली एक्सप्रेस गाडीचा अपघात टळला, करमालीवरून येतांना सिंधुदुर्ग दरम्यान अचानक धावत्या इंजिनने डबे सोडले. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली मात्र थोड्यावेळात इंजिन चालकाला घटनेची जाणीव झाल्यानंतर इंजिन डब्यांना पुन्हा जोडण्यात आले. त्यामुळे कोंकण मार्गांवर रेल्वेचा मोठा अपघात टळला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून करमालीसाठी विशेष हॉलिडे ट्रेन सुटते, तीच ट्रेन रविवारी (ता.27) रोजी करमाली वरून सिएसएमटी परत येत होती. कणकवली ते सिंधुदुर्ग दरम्यान रविवारी अचानक धावत्या एक्स्प्रेसच्या इंजिनने डबे सोडून इंजिन पुढे गेले. मात्र प्रवासी डबे सुरक्षित रुळावर उभे राहिल्याने मोठा अपघात टळला, हजारो प्रवासी यावेळी एक्सप्रेस मध्ये होते. या घटनेची चालकाला जाणीव होताच त्यांनी इंजिन थांबवून त्याला डब्याशी जोडले. त्यांनतर गाडीला सिएसएमटी स्थानकावर सुरक्षित पोहचविण्यात आले. दरम्यान त्यामुळे प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. तर भीतीचे वातावरण सुद्धा होते.

चौकशीचे आदेश
कोंकण रेल्वेने ही घटना गंभीर घेतली आहे. तांत्रिक कारणामुळे इंजिन आणि डब्याचे कपलिंग सुटले. मात्र हे नेमके कशामुळे झाले यासंदर्भात कोंकण रेल्वेने चौकशीचे आदेश दिले असल्याचे कोकण रेल्वे विभागाचे माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले.

Web Title: Konkan Railway Coaches left by running train engines