Konkan Railway : आरवली बोगद्यातून जाताना 'दिवा-सावंतवाडी' ट्रेनमध्ये अचानक मोठा आवाज! डब्यात नेमकं काय घडलं? प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Glass Windows Shatter Inside Aravali Tunnel : आरवली बोगद्यातून जात असताना दिवा-सावंतवाडी रेल्वेच्या दोन जनरल डब्यांच्या काचा अचानक फुटल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली.
Diva Sawantwadi train glass shattered in tunnel

Diva Sawantwadi train glass shattered in tunnel

esakal

Updated on

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर आरवली बोगद्यात मुंबईहून रत्नागिरीकडे येणाऱ्या ‘दिवा-सावंतवाडी’ रेल्वेच्या डब्यांच्या काचा फुटल्यामुळे बुधवारी गोंधळ उडाला होता. या प्रकारात गाडीच्या खिडक्यांच्या काचा फुटून त्याचे तुकडे डब्यात उडाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही; मात्र सतर्क ‘कोरे’ प्रशासनाने तत्काळ गाडी थांबवून प्रकाराची पाहणी केली तसेच डब्यामध्ये पडलेले काचेचे तुकडे साफ केले. त्यानंतर गावी पुढे रवाना झाली. याला कोकण रेल्वेकडून दुजोरा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai local train 2 shocking incident
Ganesh Festival 2026 Konkan Railway booking
Sawantwadi Road Railway Station latest news
Mumbai Goa Highway latest construction update
Marathi News Esakal
www.esakal.com