esakal | मुंबईकरांनो Good News: गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावणार पॅसेंजर
sakal

बोलून बातमी शोधा

special central trains permit to run on konkan train route

Good News: गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावणार पॅसेंजर

sakal_logo
By
तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीमध्ये पूर्ण आरक्षित अशा पॅसेंजर गाड्याही धावणार आहेत. दिवा सावंतवाडी, दिवा- रत्नागिरी आणि रत्नागिरी - मंडगाव या गाड्या पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. पॅसेंजर गाड्या सिटींग आरक्षणाच्या असून 7 ते 30 सप्टेंबर या कालावधीत या गाड्या धावणार असून याचे आरक्षणही सुरू झाले आहे. त्यामुळे कोकणातील सर्वसामान्य चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाव्हायरस रोग नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यंदा मात्र गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई आणि परिसरातील चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांचे आरक्षण 120 दिवसापूर्वी पूर्ण झाली आहे. तर जून महिन्यापासून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या विशेष उत्सव गाड्यांचे आरक्षणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे तीनशे ते साडेतीनशे प्रतीक्षा यादीवर असलेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेने दिलासा दिला आहे. या गणेशोत्सवात 7 सप्टेंबर पासून पॅसेंजर गाड्या सोडल्या जाणार आहे.

हेही वाचा: औषधे घ्यायचे विसरताय? मिळेल आता सूचना ; निखिल पडतेंचे संशोधन

दिवा ते सावंतवाडी, दिवा ते रत्नागिरी आणि रत्नागिरी- मंडगाव या पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहेत. या पॅसेंजर गाड्या कोकणातील सर्व रेल्वे स्थानकांवर थांबणार आहेत. तसेच नव्या स्वरूपातील लाल रंगाच्या एलबीएच कोच असलेल्या या गाड्या सोडल्या जाणार आहेत. मात्र आरक्षण असलेल्या प्रवाशांना यात प्रवास करता येणार आहे.

loading image
go to top