

Konkan Railway Ticket Crisis Continues as Passengers Struggle for Confirmed Seats Despite Multiple Train Services
sakal
कोकण रेल्वेच्या माध्यमातून मुंबईसह राज्यातील आणि परराज्यांतील विविध शहरांना जोडण्यात आले आहे. त्यामुळे कोकणच्या विकासाच्या कक्षा निश्चितच रुंदावल्या आहेत. मात्र, कोकणातून रेल्वे धावू लागून पंचवीस वर्षांहून अधिक काळ लोटला तरी गाड्यांची मर्यादित संख्या, सातत्याने हाऊसफुल्ल होणारे आरक्षण, गाड्यांना न मिळणारे थांबे, रेल्वेस्थानकांवरील पायाभूत सुविधांची वानवा आदी प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. कोकण रेल्वे असूनही रेल्वे प्रवासासाठी कोकणी माणूस वेटिंग’वरच असल्याचे विदारक चित्र दिसते. हे चित्र बदलण्यासाठी जनरेटा आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.