esakal | तब्बल 18 तासानंतर कोकण रेल्वे 'रुळांवर'!
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल 18 तासानंतर कोकण रेल्वे 'रुळांवर'!

तब्बल 18 तासानंतर कोकण रेल्वे 'रुळांवर'!

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : संततधार पावसामुळे (heavy rain) गोव्यात करमाळी तसेच थीवी स्थानका दरम्यान बोगद्यातील ट्रॅकवर माती आल्याने सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची (konkan railway) वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. कोकण रेल्वेने दुर्घटनास्थळी युद्धपातळीवर काम पूर्ण केल्यानंतर सोमवारी रात्री साडेदहा वाजता ‘ट्रॅक फिट सर्टिफिकेट’ (track feet certificate) देण्यात आल्यावर कोकण रेल्वेची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. अशी माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.

दरम्यान, गोव्यात थीवीनजीक रेल्वे रुळांवर माती आल्याने रेल्वे सेवा सोमवारी पहाटेपासून विस्कळीत झाली. यामुळे सोमवारी रात्री काही गाड्यांच्या प्रवाशांना इतर गाडीतून प्रवास करण्याची मुभा कोकण रेल्वेकडून देण्यात आली. यानुसार मंगळुरू - मुंबई एक्सप्रेस (01134) या 19 रोजी प्रवास सुरु होणार्‍या गाडीतून मडगाव, करमाळी, कणकवली तसेच रत्नागिरी येथून प्रवास करणार्‍याना पाठोपाठ येणार्‍या 19 जुलैच्या मत्स्यगंधा स्पेशल (02620) मधून मुंबईच्या दिशेने प्रवास करण्याची मुभा रेल्वेने दिली. तसेच मुंबई सीएसएमटी - मंगळुरू (01133) गाडीच्या कर्मली, मडगाव, कारवार, कुमठा, भटकळ, मुकांबिका येथील प्रवाशांना एलटीटी - मंगळुरू (02619) या गाडीतून प्रवास मुभा देण्यात आली. दुर्घटनेनंत प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळे कोकण रेल्वेने त्याच मार्गावर इतर गाडीतून प्रवास करण्याची परवानगी दिली.

हेही वाचा: Konkan Rain Update - मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

थिवीनजीकच्या बोगद्यात माती आल्यानंतर कोकण रेल्वेचे अधिकारी, अभियंते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तब्बल 18 तासांच्या प्रयत्नांनंतर सोमवारी रात्री 10 च्या सुमारास हे काम पूर्ण झाले. रात्री साडेदहा बाधित लोकमार्ग वाहतकीस योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यावर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली. मार्ग मोकळा केल्यानंतर डाऊन मत्स्यगंधा स्पेशल गाडी (02619) दुर्घटनाग्रस्त भागातून पहिल्यांदा मार्गस्थ करण्यात आली.

कोकणकन्या एक्स्प्रेस साडेआठ तास उशिरा

मार्गावर मातीचा अडथळा आल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असल्याने 19 जुलै राजी रात्री 11.05 वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटणारी डाऊन कोकणकन्या एक्स्प्रेस (01111) पुननिर्धारित वेळापत्रकानुसार मुंबईतून तब्बल 8 तास उशिरा म्हणजे मंगळवारी सकाळी 7.10 वाजता सुटणार असल्याचे रेल्वेकडून कळवण्यात आले. मात्र, मंगळवारी प्रत्यक्षात ही गाडी साडेआठ तास विलंबाने धावत होती.

हेही वाचा: सिंधुदुर्गात पाटबंधारेसाठी 505 कोटी; विनायक राऊत यांची माहिती

loading image