esakal | कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

रत्नागिरी - गणेशोत्सवसाठी जादा गाड्या सोडल्याने कोकण रेल्वेचे नेहमीचे वेळापत्रक कोलमडले. तब्बल 20 गाड्या उशीराने धावत आहेत. एकेरी मार्ग असल्यामुळे गाड्यांचे नियोजन करण्यात रल्वे प्रशासनास अडचणी येत आहेत. दुहेरी मार्ग असता तर ही समस्या उद्धवली नसती असे तज्ज्ञांचे मत आहे. 

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - गणेशोत्सवसाठी जादा गाड्या सोडल्याने कोकण रेल्वेचे नेहमीचे वेळापत्रक कोलमडले. तब्बल 20 गाड्या उशीराने धावत आहेत. एकेरी मार्ग असल्यामुळे गाड्यांचे नियोजन करण्यात रल्वे प्रशासनास अडचणी येत आहेत. दुहेरी मार्ग असता तर ही समस्या उद्धवली नसती असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान गाड्या वेळाने धाव असल्याने चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे. 

उशीराने धावणाऱ्या गाड्या

पोरबंदर एक्स्प्रेस 11 तास उशिराने. कोकणकन्या एक्सप्रेस 2 तास 55 मिनिटे, तुतारी एक्सप्रेस 1 तास 45 मिनिटे, पुणे - मडगाव ३ तास 45 मिनिटे, सावंतवाडी गणपती विशेष 2 तास 30 मिनिटे, नेत्रावती एक्स्प्रेस 6 तास उशीराने धावत आहे. 

दरम्यान, रविवारी तब्बल तीन ते पाच तास गाड्या उशीराने धावत होत्या त्यामुळे अनेक चाकरमान्यांना आज सकाळी आगमनाच्या वेळी घरात यावे लागले.

loading image
go to top