असे असेल एक नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

रोहा ते वेरणा आणि वेरणा ते ठोकूरपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने हातात घेतले होते. नव्या स्थानकामध्ये इंदापूर, गोरेगाव रोड, सापेवामने, कलंबानी, कडवई, वेरावल्ली, खारेपाटण, आचिर्णे या स्थानकांचा समावेश आहे.

कणकवली - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक ‘नोव्हेंबरपासून बदलत आहे. आता गाड्यांचा वेग वाढणार आहे. गाड्यांचा विलंब टाळण्यासाठी २१ नवीन क्रॉसिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. तसेच काही भागात मार्गाचे विद्युतीकरणही सुरू झाले आहे. 

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणच्या भूमीत प्रवास करणारा पर्यटक आणि चाकरमानी कोकण रेल्वेला अधिक पसंती देतो. मुंबईतून कोकण, गोवा आणि दक्षिणेकडच्या राज्यांकडे जाणारा हा सुलभ मार्ग आहे. २६ जानेवारी १९९८ ला  कोकण रेल्वे प्रथम धावली. त्यावेळेस केवळ ६६ स्थानके होती. आता नव्या २१ स्थानकांची भर पडल्याने ही संख्या ७८ वर पोहोचणार आहे.

रोहा ते वेरणा आणि वेरणा ते ठोकूरपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने हातात घेतले होते. नव्या स्थानकामध्ये इंदापूर, गोरेगाव रोड, सापेवामने, कलंबानी, कडवई, वेरावल्ली, खारेपाटण, आचिर्णे या स्थानकांचा समावेश आहे. स्थानकांची संख्या वाढल्याने रेल्वे गाड्यांचा विलंब टाळला जाणार आहे. 

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या कणकवली स्थानकातील वेळा अशा - 

मंगला एक्‍स्प्रेस पहाटे ५.४२ वा., दिवा पॅसेंजर ९.२१, मांडवी एक्‍स्प्रेस ११.३३, जनशताब्दी एक्‍स्प्रेस १६.२८, तुतारी एक्‍स्प्रेस सायंकाळी ७.४४, कोकणकन्या एक्‍स्प्रेस रात्री ९.०८, मेंगलोर एक्‍स्प्रेस ८.४०, डबलडेकर (मंगळवार, गुरूवार) सकाळी ८.१०, ओका एक्‍स्‍प्रेस (गुरुवार, शनिवार) दुपारी १.३८ वा., पुणे एक्‍स्प्रेस (मंगळवार, शुक्रवार) सायंकाळी ७.१०, वातानुकूलीत करमळी एक्‍स्प्रेस (गुरुवारी) दुपारी ३.२०, तिरूनवेली दादर एक्‍स्प्रेस (गुरुवार) सकाळी ६.२८, बिकानेर एक्‍स्प्रेस (रविवार) सकाळी ६.२९, डबलडेकर (दर रविवारी) दुपारी ३ वा. , ‘कोकणकन्या’ ही सावंतवाडी स्थानकात तर मुंबईकडे जाण्यासाठी सायंकाळी ७.३६ला कुडाळ, ८.९ सिंधुदुर्ग, ८.२८, वैभववाडी ९.३८, ‘तुतारी’ ही सावंतवाडी येथून सायंकाळी ६.५०ला सुटून कुडाळ ७.१०, सिंधुदुर्ग ७.३०, ‘मांडवी’ ही सावंतवाडी १०.४०, कुडाळ ११.०२ वा., ‘नेत्रावती’ ही कुडाळला सकाळी ६.५०, ‘तेजस’ एक्‍स्प्रेस कुडाळला ३.२८ वाजता येणार आहे.

हे वेळापत्रक १ नोव्हेंबर ते १० जून या कालावधीसाठी लागू राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Railway schedule from November 1