फेसबुक पोस्टची दखल घेत जनशताब्दीची काढली गळती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्‍स्प्रेसच्या डब्यात लागलेल्या गळतीची माहिती मिळाताच प्रशासनाने तत्काळ त्यावर कार्यवाही केली. फेसबुकवर केलेल्या व्हीडीओ पोस्टवरुन एका सजग प्रवाशाने ही माहिती आपल्या फेसबुक मित्राच्या मदतीने  रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोचवली होती.

एका प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील अभिनेते स्वानंद हे दादर-मडगाव या जनशताब्दी एक्‍स्प्रेसने गुरूवारी प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या जागे शेजारी डी 1 या डब्यात पावसाचे पाणी गळत होते. पावसाचे पाण्याच्या या गळतीने अनेक प्रवासी भिजतही होते. रेल्वेगाडीत टपटप गळणाऱ्या पावसाचा व्हिडीओ स्वानंद यांनी तयार केला  व तो फेसबुकवर अपलोड केला. या व्हिडिओत त्यांनी रत्नागिरी येथील प्रा. उदय बोडस यांना टॅग केला. व्हिडीओ पाहिल्यावर प्रा. बोडस यांनी तो व्हिडीओ कोकण रेल्वे क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंड्ये यांच्याकडे पाठवला. श्री. शेंड्ये यांनी या घटनेची तातडीने दखल घेत मडगाव कार्यशाळेतील अधिकाऱ्यांना सांगितले. मडगाव येथील कर्मचारी वर्गाने भर पावसात तात्पुरती उपाययोजना करून सुरू असलेली गळती रोखली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Railway Take note of Facebook post and remove leakage