#KonkanRains वेंगुर्लेत पुरस्थिती गंभीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

वेंगुर्ले - तालुक्‍याला आज सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती; मात्र पुन्हा सकाळी अकरापासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. यामुळे शहरासहित तालुक्‍यात इतर ठिकाणी रस्त्यांवर, पुलांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होती, तर वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वेंगुर्ले - तालुक्‍याला आज सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती; मात्र पुन्हा सकाळी अकरापासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. यामुळे शहरासहित तालुक्‍यात इतर ठिकाणी रस्त्यांवर, पुलांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होती, तर वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरणला मोठे अडथळे येत आहेत. आज सकाळी 8 वाजेपर्यंत 121.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

मुसळधार पडलेल्या पावसमूळे शहरातील कॅम्प भागात गटार तुडुंब भरून वाहत असल्याचे सर्वच रस्त्यांवर पाणी आले होते. कॅम्प नवीन म्हाडा इमारतीसमोर रामघाटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी असल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. एसटी परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तालुक्‍यात सकाळच्या सत्रात चिपी येथील सत्यवती वसंत चुरमुरे यांच्या घराची भिंत व कौले पडून सुमारे 64 हजार नुकसान झाले.

रामचंद्र लक्ष्मण राणे यांच्या घराच्या भिंती व वासे पडून तर सहकारी खरेदी विक्री संघाचे दुकान क्रमांक 5 चे पत्रे उडून जाऊन धान्य भिजून नुकसान झाले. आज चौथ्या दिवशीही तळवडे होडावडा नदीच्या पुलावर पाणी असल्याने सावंतवाडी तुळस मार्गे वेंगुर्ले वाहतूक ठप्प होती. सर्वत्र पावसामुळे दाणादाण उडल्याने एसटी वाहतूकही बंद करण्यात आली होती. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rains flood in Vengurle

टॅग्स