#KonkanRains करूळ घाटात दरड कोसळली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

वैभववाडी - मुसळधार पावसामुळे आज सायंकाळी पाचच्या सुमारास करूळ घाटात दरड कोसळली. दगड, माती आणि झाडांचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे वैभववाडी-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याच्या कामाला सुरवात केली आहे. 

आज दुपारनंतर तालुक्‍यात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. या पावसाचे प्रमाण घाटक्षेत्रात अधिक होते. त्यामुळे पाचच्या सुमारास करूळ घाटात मोठी दरड कोसळली. दगड, माती आणि झाडे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे वैभववाडी-गगनबावडा मार्गावर सुरू असलेली वाहतूकदेखील ठप्प झाली आहे. घाटात दरड पडल्याचे समजताच बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरवात केली आहे. दरडीने सुमारे साधारणपणे 60 ते 70 फूट रस्त्याचा भूभाग व्यापल्यामुळे ही दरड हटविण्यासाठी किमान दोन दिवस लागण्याची शक्‍यता आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rains land slice in karul Ghat