Konkan Rock Art included in Maharashtra textbook
esakal
राजापूर : कोकणातील प्रागैतिहासिक मानवी जीवनाचा उलगडा करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पांचा सहावीच्या इतिहास व नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात समावेश केला (Ratnagiri Petroglyphs in Maharashtra Education) आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या जागतिक वारशाची माहिती अभ्यासता येणार असून, त्यांच्यामध्ये वारसा जतनाची जबाबदारी, संशोधनाची आवड आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.