प्रद्योत आर्ट गॅलरीत कोकण स्पर्श कलाप्रदर्शन

प्रद्योत आर्ट गॅलरीत कोकण स्पर्श कलाप्रदर्शन

२५ (टूडे २ साठी, अँकर)

- rat६p२०.jpg ः
P२४M८८३३४
निखिल कांबळे
- rat६p२१.jpg, rat६p२२.jpg, rat६p२३.jpg ः
२४M८८३३५, P२४M८८३३६
निखिल कांबळे यांची चित्रे.
- rat६p२४.jpg ः
२४M८८३३८
नीलेश पावसकर
- rat६p२५.jpg, rat६p२६.jgp ः
२४M८८३३९, OP२४M८८३४०
नीलेश पावसकर यांची चित्रे.
---------

प्रद्योत आर्ट गॅलरीत ‘कोकण स्पर्श’ कलाप्रदर्शन

आज उद्घाटन ः नीलेश, निखिल यांनी निसर्गातील टिपले बारकावे

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः आपल्या चित्रातून मानवी मनाच्या नानाविध कंगोऱ्यांचा आढावा घेणाऱ्या रत्नागिरी येथील चित्रकार नीलेश पावसकर आणि निखिल कांबळे यांच्या कोकणस्पर्श या चित्रांचे प्रदर्शन रत्नागिरी येथील प्रद्योत आर्ट गॅलरीमध्ये ७ ते १३ जूनदरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान भरणार आहे. कलारसिकांनी या चित्र प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन प्रद्योत आर्ट गॅलरीच्या क्युरेटर मयुरी घाणेकर यांनी केले आहे.
रत्नागिरी येथील चित्रकार नीलेश पावसकर आणि निखिल कांबळे हे दोघेही प्रयोगशील कलाकार म्हणून ओळखले जातात. निसर्गातील बारकावे टिपण्याची आवड असणाऱ्या या दोन्ही कलाकारांनी कोकणच्या ग्रामीण जीवनासह मानवी मनाच्या कंगोऱ्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपल्या असंख्य कलाकृतीतून केला आहे. दोघेही कलाशिक्षक असून त्यांनी आजवर विविध ठिकाणी आपल्या चित्रांची प्रदर्शने भरवली आहेत. निखिल कांबळे हे उत्तम रांगोळीकार म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. ७ जूनला सकाळी ११ वा. प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून या वेळी चित्र संग्राहक विवेक शानभाग, कौमुदी बिल्डर्सचे संतोष तावडे, चित्रकार रवींद्र मुळये, चित्रकार नीलेश शिळकर, प्रद्योत आर्ट गॅलरीचे संस्थापक डॉ. प्रत्युष चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com