कोकणातील पारंपारिक 'शिमगोत्सव' माहितीपटातून उलगडणार....

वांद्री,उक्षी व आंबेड गावात मुहूर्त व चित्रीकरण;काव्या ड्रीम मुव्हीज ची निर्मिती आशिष निनगुरकर यांचे दिग्दर्शन
konkan tradition holi Shimgotsav unfold through documentary ratnagiri
konkan tradition holi Shimgotsav unfold through documentary ratnagiri sakal
Updated on

रत्नागिरी : कोकणातला शिमगोत्सव म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कार असतो. फाक पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.बाहेरगावी असलेले चाकरमानीही हमखास शिमगोत्सवासाठी गावी येतात. ग्रामदेवतेच्या पालख्या गावागावांत फिरत असतात आणि सगळीकडे एक वेगळेच जल्लोषाचे वातावरण असते. या पालख्या का नाचवतात? कशा नाचवतात? होळी कशी आणतात? गावागावातल्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा कशा असतात, अशा प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी युवा दिग्दर्शक आशिष निनगुरकर यांचा 'प्रथा आणि परंपरा' नावाच्या माहितीपटाची निर्मिती होत आहे.

नुकतेच या माहितीपटाचा चित्रीकरणाचा मुहूर्त वांद्री गावातील श्री सोमेश्वर मंदिरात पार पडला.यावेळी गजानन डांगे,दिलीप मयेकर,मनोहर डांगे,गजानन सालीम,पुरुषोत्तम रानभरे,सुरेश चोचे,संजय सागवेकर,दिगंबर डांगे,नितीन डांगे,विनायक सलगर,संदेश गांधी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच उक्षी व आंबेड येथे चित्रीकरण करण्यात आले.त्या कार्यक्रमास राजेंद्र देसाई,पद्माकर देसाई,गणपत घाणेकर तसेच आंबेड गावातील प्रवीण मुळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा ! कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.

काव्या ड्रीम मुव्हीज व कलादर्पण फाऊंडेशन यांच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या 'शिमगोत्सव- प्रथा आणि परंपरा' या माहितीपटाची संकल्पना विक्रांत गांधी,विकास ताठरे व महेश भिंगार्डे यांची असून या माहितीपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे वांद्री,उक्षी व आंबेड गावात करण्यात आले आहे.या माहितीपटाचे लेखन व दिग्दर्शन आशिष निनगुरकर यांनी केले आहे.सिद्धेश दळवी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली असून प्रतिश सोनवणे,प्रदीप कडू व सुनील चौपाल इतर तंत्रज्ञांनी आपल्या भूमिका समर्थपणे सांभाळल्या आहेत.या माहितीपटासाठी निर्माती अर्चना नेवरेकर,सामाजिक कार्यकर्ते दिपक मेंदर्गे व निर्माते मंगेश जगताप यांचे सहकार्य लाभले आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा माहितीपट प्रदर्शित केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com