
रत्नागिरी : लोटे येथील संकल्प इंडस्ट्रीज कंपनीत आग
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये रविवारी ता. २२ रोजी सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आहे. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने ग्रामस्थांच्या मदतीने आगिवर नियंत्रण मिळवले असून आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील संकल्प इंडस्ट्रीज या लहान कारखान्यात रविवारी ता. २२ रोजी सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.
धुराचे हवेत पसरलेले लोळ पाहून परिसरातील ग्रामस्थ व इतर कंपन्यांतील कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. लोटे औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांची संकल्प कंपनीत लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कंपनीमध्ये धोकादायक पद्धतिने ठेवण्यात आलेल्या रसायनांनी पेट घेतल्याचे काही प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. एक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून कंपनीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
Web Title: Konkan Update Fire At Sankalp Industries Lote Khed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..