बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणी खवय्येगिरांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

सध्या सगळीकडे कोरोनाचे सावट असल्याचे विसरुन खवय्यांनी मोठी गर्दी केली होती

सावंतवाडी : तब्बल सव्वा महीना मच्छी मटनापासुन दुर असलेल्या खवय्यांनी अकरा दिवसाच्या गणरायाला निरोप देताच आज मासे, मटण तसेच चिकन खरेदीसाठी येथील मार्केटमध्ये मोठी गर्दी केली होती. कोरोनाची कोणतीही भीती न बाळगता अक्षरशः मासे खरेदीसाठी येथील मच्छी मार्केटमध्ये नागरिक तुटून पडले होते.

हेही वाचा - Good News : कोकणकर यंदा भातलागवडीत झाली वाढ, वाचा..

श्रावण त्यापाठोपाठ गणेश चतुर्थी असे सव्वा महीने मांसाहारापासुन खव्वये दुर असतात, मात्र लाडक्‍या गणरायाला निरोप दिल्यानंतर अनेकजण मास-मटणाकडे वळतात. अकरा दिवसाच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर आज येथील मच्छीमार्केटमध्ये तसेच तालुक्‍यातील छोट्या मोठ्या बाजारपेठेत गर्दी दिसुन आली. सध्या सगळीकडे कोरोनाचे सावट असल्याचे विसरुन खवय्यांनी मोठी गर्दी केली होती.

येथील मच्छी मार्केटमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेने काही नियम घालुन दिलेले असतानाही आज मोठी गर्दी होती. मासे खरेदीसाठी होणारी लोकांची गर्दी लक्षात घेता दरही वधारले होते. मात्र किंमतीकडे डोळाझाक करत मासे चढ्या भावाने का होईना ते खरेदीसाठी नागरिकांनी पसंती दिली.

हेही वाचा -  अठरा तास ड्यूटीरुन यंदा खाकीला मिळाली थोडीशी उसंत...

चिकन, मटण खरेदीकडेही नागरिकांचा कल होता. सकाळपासुन चिकन सेंटरच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेश चतुर्थी सणात स्वस्त मिळणाऱ्या माशांना आज चांगला दर होता. यामध्ये बांगडा, सुरमय, पापलेट तसेच मोरीला खवय्यांनी पसंती दर्शवली होती. पापलेट तीनशे रुपये जोडी तसेच सुरमय दीडशे रुपये एक काप असा दर होता. चिकन दोनशे रुपये तर कोंबडी 130 रुपयाला किलो मिळत होती.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkani people buy meat and fish after ganesh festival enjoy foodie people