

Konkan’s Sky Alive with Colours: A Haven of Bird Diversity
esakal
- राजेंद्र बाईत, राजापूर
पश्चिम घाट आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलेल्या कोकणातील जैवविविधता आणि निसर्गसंपदा सार्यांचे लक्ष वेधून घेते. त्याला विपुल पक्षीवैभवाचीही जोड मिळाल्याने खऱ्या अर्थाने कोकणचे निसर्गसौंदर्य आणि जैवविविधता अधिक खुलली आहे. ‘बर्ड वॉच’सारखे पर्यटन राबवल्यास त्यातून नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होताना निसर्गाचेही जतन आणि संवर्धन होणार आहे; मात्र निसर्गसाखळीमध्ये महत्त्वपूर्ण असलेले आणि पर्यावरणातील विविध मानांकनाचे सूचक ठरणारे पक्षीवैभव अनेक कारणांमुळे धोक्यात येऊ लागले असून काही पक्षी प्रजाती संकटात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे कोकणच्या पक्षीवैभवाचे जतन आणि संवर्धनासाठी जनप्रबोधनासोबतच सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.