esakal | सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणूकीत कोरगावकरांचे बंड कोणाच्या पथ्यावर ? 
sakal

बोलून बातमी शोधा

Korgaonkar Rebellion In Sawantwadi City President Election

सौ. कोरगावकर यांनी प्रचारात आघाडी घेत "आपलीच वहिनी' असा उल्लेख असलेली पत्रके घराघरात पोचवली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचलेल्या पत्रकात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन धर्माचे प्रतीक असलेली धार्मिक चिन्हे वापरून सर्व धर्म समानता असा संदेश पोहोचविला आहे.

सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणूकीत कोरगावकरांचे बंड कोणाच्या पथ्यावर ? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - पक्षांकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी "आपलीच वहिनी' असे पत्रक घराघरात पोचवत शहरात प्रचारात आघाडी घेतली आहे. पक्षांतर्गत त्यांनी एक प्रकारे केलेले हे बंड कोणाच्या पत्त्यावर पडते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या तिकीटावर निवडणुक लढविण्यसाठी इच्छुक होत्या; मात्र पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यास होणारा विलंब व संजू परब यांच्या नावाला असलेली पसंती लक्षात घेता सौ. कोरगावकर यांनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यापुर्वी दोनच दिवसापूर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वानाच आर्श्‍चयाचा धक्‍का दिला होता. दुसरीकडे पक्षाकडून खासदार नारायण राणे यांनी उमेदवार म्हणुन संजू परब यांच्या नावाची केलेली घोषणा व सौ. कोरगावकर यांनी भरलेली उमेदवारी आणि सुरू केलेला हा बंडखोरीच्या दिशेने निश्‍चित मानला जात आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्रातील सरकारवर खासदार नारायण राणेंची ही टीका

कोरगावकर प्रचारात आघाडी

सौ. कोरगावकर यांनी प्रचारात आघाडी घेत "आपलीच वहिनी' असा उल्लेख असलेली पत्रके घराघरात पोचवली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचलेल्या पत्रकात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन धर्माचे प्रतीक असलेली धार्मिक चिन्हे वापरून सर्व धर्म समानता असा संदेश पोहोचविला आहे. दुसरीकडे त्यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध विषयांना हात घातला आहे. हे पत्रक सध्या सावंतवाडी चर्चेचा विषय ठरला आहे. 

आता माघार नाही ? 

सौ. कोरगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत पक्षाकडून प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे; मात्र असे असले तरी कोरगावकर यांनी ज्या प्रकारे प्रचारात घेतलेली आघाडी लक्षात घेता त्या उमेदवारी मागे घेणार नसल्याचे बोलले जात आहे. कोरगावकर यांनी तीन वर्षांत उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहताना लोकांची जोडलेले नाते त्यामुळे त्यांना मानणारा वेगळा गट आहे. शिवाय अपक्ष म्हणूनही त्या निवडून आल्या होत्या. एकुणच कोरगावकर या निवडणुकीतून माघार की संजू परब यांच्या विरोधात बंड पुकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.  

हेही वाचा - अजब ! राधानगरी, तिलारी जंगलातील ट्रॅप कॅमेरेच चोरीस 

loading image