Koyna Project Water Crisis
esakal
चिपळूण : कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती ठप्प झाल्याचा सर्वाधिक मोठा परिणाम लोटेसह चिपळूण तालुक्यातील उद्योजकांना बसला (Koyna project water crisis) आहे. लोटे परशुराम खेर्डी, खडपोली औद्योगिक वसाहतीमधील शेकडो कंपन्या पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा होणाऱ्या गावांमध्येही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मोठ्या कंपन्यांकडे त्यांनी साठवलेला पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबला तर त्या कंपन्या बंद पडण्याची भीती आहे.