कुडाळ : रक्तदान करून सामाजिक उपक्रमांत हातभार लावावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

blood donation

कुडाळ : रक्तदान करून सामाजिक उपक्रमांत हातभार लावावा

कुडाळ : रक्तदान ही काळाची गरज ओळखून प्रत्येकाने रक्तदान करून सामाजिक उपक्रमांत हातभार लावावा. ग्रामीण भागातील युवा वर्गाचा अशा सामाजिक उपक्रमांत सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी केले. जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे कळसुली येथे आयोजित रक्तदान शिबिरप्रसंगी ते बोलत होते.

माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर व अन्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन कळसुली उपकेंद्र येथे करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन श्री. सुद्रिक यांनी स्वतः रक्तदान करून केले. ते पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदान चळवळ वृद्धिंगत होत आहे. रक्तदान करून दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. आज कळसुली गावात ही चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी युवावर्गाचे फार मोठे सहकार्य लाभत आहे. रक्तदान करून दुसऱ्याचा जीव वाचविण्याची सामाजिक भावना प्रत्येकामध्ये निर्माण झाली पाहिजे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली जातात; मात्र ही शिबिरे राजकीय दृष्टिकोन ठेवून आयोजित करू नयेत, तर गरजेसाठी असावीत.

जिल्ह्यामध्ये रक्ताची भासू नये, यासाठी रक्तदान चळवळीला प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे.’’ यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर घाडीगावकर, चंद्रशेखर चव्हाण, भोगनाथ सोसायटीचे चेअरमन रामा नाईक, श्री. घाडीगावकर, ‘युवक’चे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. भरत घाडीगावकर, सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, बाबाजी मुरकर, तातोबा गावकर, श्री. तावडे, सत्यविजय परब, सत्यवान परब, विकास दळवी, श्री. माजरेकर, दीपक भोगले, सागर शिर्के, बाळा नारकर, दिनकर परब, डॉ. जास्मिन शेख, सुजाता आरकडे, स्नेहा चव्हाण, रामेश्वर चिवडे, लक्ष्मण घाडीगावकर, कृष्णा घाडीगावकर, महेश देसाई, संतोष दळवी, महेश घाडीगावकर, श्री. वायंगणकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. रक्तदात्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Kudal Contribute Social Activities Donating Blood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top