कुडाळ : तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने मोहीम अधिक तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत सोमवारी (ता. ८) रात्री साडेआठच्या सुमारास नाबरवाडी परिसरात अवैध वाळूने भरलेले दोन डंपर जप्त केले. .उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तहसीलदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाला नाबरवाडीत दोन डंपरमधून अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. .Sindhudurg News : कोकणातील रस्त्यांची दुरवस्था ‘अधिवेशनात’ दणका; स्वतंत्र निकष लावण्याची निलेश राणेंची ठाम मागणी.मंडल अधिकारी रविकांत तारी, ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, सोनाली मयेकर, स्नेहल सगरे आणि शिवदास राठोड या अधिकाऱ्यांचा पथकात समावेश होता. तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी दोन ब्रास प्रमाणे एकूण चार ब्रास अवैध वाळू आढळली..जप्त वाहने मालक संजय शिंदे, बांदा (एमएच ०७ एएच १८६५), मालक दयानंद अनावकर, पणदूर (एमएच १४ एचजी ७५१६), अशी आहेत. महसूल विभागाच्या नियमांनुसार संबंधित वाहनचालक व मालकांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या अचानक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे..Sindhudurg News : धामणी धरणातील पिंजरा मत्स्यपालन अंतिम टप्प्यात मत्स्यउत्पादन वाढीने प्रशासनाचा आत्मविश्वास उंचावला.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.