सिंधुदुर्ग - कुडाळात त्रिशंकु , शिवसेनेला-भाजपाला समान संधी

दरम्यान दोडामार्गाची निकाल प्रतिक्रिया अजूनही सुरु आहे.
bjp shivsena
bjp shivsenaesakal
Updated on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, देवगड-जामसांडे, वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा दुसरा टप्पा संपला आहे. तेथील उर्वरित प्रत्येकी चार जागांसाठी मतदान प्रक्रिया झाली. दरम्यान आज निकालचा दिवस आहे. नगरपंचायत निवडणुकमध्ये वैभववाडीत भाजपाला ९, शिवसेनेला ५, अपक्षांना ३ जागा मिळाल्या आहेत. निलेश राणें यांनी हा गड जिंकला आहे. कुडाळमध्ये मात्र नारायण राणेंना धक्का बसणार का ? की सत्ताधारी बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे. याठिकाणी भाजपला ८, सेनेला ७ तर काँग्रेसला २ जागा याठिकाणी मिळाली आहे. काहीशा प्रमाणात त्रिशंकु परिस्थिती पहायला मिळत आहेत. दरम्यान दोडामार्गाची निकाल प्रतिक्रिया अजूनही सुरु आहे.

bjp shivsena
Corona - देशात दिवसभरात 2 लाख 82 हजार नवे रुग्ण; 441 जणांचा मृत्यू

दुसऱ्या टप्प्यात एकूण सात हजार ६३ पैकी पाच हजार २९९ मतदारांनी हक्क बजावल्याने सरासरी ७५.०२ टक्के मतदान झाले. मतमोजणी झाली आहे. चारही नगरपंचायतसाठी एकूण २११ उमेदवारांचे बंद झालेले राजकीय भवितव्य समोर येत आहे. राज्यातील १०५ नगरपंचायतसह जिल्ह्यातील या चार नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊन २१ डिसेंबरला मतदान झाले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेले प्रभाग वगळून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे चारही नगरपंचायतीमधील ओबीसी आरक्षित असलेले प्रत्येकी चार प्रभाग वगळून उर्वरित १३ प्रभागांसाठी मतदान झाले. त्यानंतर निवडणूक विभागाने हे ओबीसी आरक्षित प्रभाग अनआरक्षित करीत पुन्हा सोडत काढली.

bjp shivsena
निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाला धक्का; चार आमदार भाजपात दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com