निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाला धक्का; चार आमदार भाजपात दाखल I UP Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP Election

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसलाय.

निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाला धक्का; चार आमदार भाजपात दाखल

UP Election : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) चार विधान परिषद सदस्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये (BJP) सामील झालेल्या सपा नेत्यांमध्ये रविशंकर सिंह, नरेंद्र भाटी, सीपी चंद आणि रामा निरंजन यांचा समावेश आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह (Swatantra Dev Singh), राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत या नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. हे नेते अखिलेश यादव यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून नाराज असल्याचं सांगण्यात येतंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह म्हणाले, आज अखिलेश यादव यांना झोप लागणार नाही. भाजपात प्रवेश केलेल्या या नेत्यांमुळं पक्षाला बळ मिळणार आहे. सपामध्ये तुमचे मित्र आहेत, त्यांनाही तुम्ही भाजपमध्ये आणाल, अशी तुमच्याकडून अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: UP Election : अखिलेश यादव, मायावतींना योगींचा दणका

गेल्या अनेक दशकांपासून सपाला बळ देणारे नरेंद्र भाटी आज भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचंही स्वतंत्र सिंह म्हणाले. भाटी यांनी पक्षात प्रवेश केल्याने पश्चिम उत्तर प्रदेशात भाजप मजबूत होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. रविशंकर सिंह हे बलियाच्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. स्वतंत्र देव सिंह यांनी सीपी चंद आणि रामा निरंजन यांना गोरखपूरहून बोलावून त्यांचंही पक्षात स्वागत केलं.

हेही वाचा: विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता NCP पॅनेलला मत द्या : शिवेंद्रसिंहराजे

loading image
go to top