अपयशाने खचू नका, कामाला लागा-राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सामंत

कुडाळ, दोडामार्गमधील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर
NCP
NCPSakal
Updated on: 

कुडाळ : कुडाळ व दोडामार्ग तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे नामंजूर करण्यात आले आहेत. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी माहिती दिली.सामंत यानी सांगितले की, जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील व कुडाळमधील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे पक्षाकडे सोपिवले होते. या राजीनाम्यांसंदर्भात प्रदेशचे नेते, तसेच जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या निर्देशानुसार दोडामार्ग तालुक्यातील व कुडाळ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे नामंजूर केले आहेत.

NCP
वैभववाडी : करवंटी, सुपारीच्या वस्तू जागतिक बाजारात

त्यांना यापुढे पक्षाच्या संघटनात्मक कामाला जोमाने लागा, असे संबोधित केले असून राजकारणात एका पराभवाने कार्यकर्ते वा पक्ष संपत नाही, जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात नगरपंचायत निवडणुका झाल्या त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मन लावून एकसंघपणाने काम केले होते; पण साम, दाम, दंड या प्रयोगात आम्ही कमी पडलो. तरीही राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला तर काही जागांवर समसमान मतांमुळे पराभव स्वीकारावा लागला; पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या एका निवडणुकीमुळे नाराज न होता पुन्हा नव्या दमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी एक वज्रमूठ तयार करुया.

NCP
जयसिंगपुर : विद्यार्थ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा प्रकरणी मुख्याध्यापक धारेवर

संघटनेत चढ उतार हे येतच असतात. याचा प्रत्यय आपण २०१४ पूर्वी याच जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून दाखवून दिला होता; पण मध्यंतरीच्या कालावधीत संघटना अस्थिर का झाली याचे विश्लेषण करत बसण्यापेक्षा आता पासून नव्या दमाने सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करूया. पक्षाला प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे. यापूर्वी जिल्ह्यातील संघटनेत त्रृटी काय राहिल्या व यापुढे त्या दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी लवकरच प्रदेश नेत्यांनी चर्चा करून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे.

यापुढे सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेला ताकद देण्यासाठी खास नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. काल झालेल्या नगरपंचायतीच्या निकालाची सविस्तर माहिती प्रदेश नेत्यांना दिली असून वरिष्ठांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुडाळ व दोडामार्ग येथील पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे नामंजूर करण्यात येत असल्याचे सामंत यांनी सांगून यापुढे ज्या ज्या पदावर जे पदाधिकारी पक्षाचे काम करत होते त्या पदाधिकाऱ्यांनी त्याच पदावर राहून आपआपल्या भागात पक्षाचे जोमाने काम करावे, असे वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट करून यापुढे वरिष्ठ नेते जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटना बळकटीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे स्पष्ट केले आहे.

NCP
खारघरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

यापुढे एकदिलाने काम करूया

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी वा पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत निवडणुकीत अपयश आले म्हणून खचून न जाता पुढील काळात एकदिलाने पक्षाचे काम करून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी आजपासून सुरुवात करूया. राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या भागात सुद्धा कमी अधिक प्रमाणात अपयश आले आहे; मात्र ते खचून न जाता जसे पुन्हा उभारी घेऊन नव्या दमाने सुरुवात करणार आहेत, त्याच पद्धतीने आपण संघटनेसाठी वाटचाल करुया, असे जिल्हाध्यक्ष सामंत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com