
-अमित गवळे
पाली : माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध निसर्गरम्य अशा कुंभे जवळच्या चन्नाट परिसरात पावसाळ्या नंतरही उत्साही ब्लॉगर व पर्यटकांचा जीवघेणा खेळ सुरूच आहे. निष्काळजीपणे येथील धोकादायक ठिकाणी वावर तसेच कुंडामध्ये उड्या मारणे अशा गोष्टी होतांना दिसत आहे. स्थानिक प्रशासन व वन विभागाने यावर त्वरित कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.