स्वच्छ ग्राम स्पर्धेत कुशेवाडा ग्रामपंचायत राज्यात तृतीय

स्वच्छ ग्राम स्पर्धेत कुशेवाडा ग्रामपंचायत राज्यात तृतीय
Updated on

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०१७- १८ यात वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. दरम्यान या पुरस्काराचे वितरण १ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत यांनी दिली आहे. (Kushewada Gram Panchayat has secured third position in the state level clean village competition)

स्वच्छ ग्राम स्पर्धेत कुशेवाडा ग्रामपंचायत राज्यात तृतीय
सिंधुदुर्ग पुन्हा चौथ्या टप्प्यात; हे राहणार सुरु, हे बंद

या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी महासूल मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्राम विकास मंत्री, राज्यमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता, राज्यमंत्री ग्रामविकास, मा. अप्पर मुख्यसचिव (पाणीपुरवठा व स्वच्छता), मा. अप्पर मुख्यसचिव (ग्रामविकास), मा. सह सचिव (स्वच्छ भारत मिशन), पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय यांची उपस्थिती असणार आहे.

स्वच्छ ग्राम स्पर्धेत कुशेवाडा ग्रामपंचायत राज्यात तृतीय
सिंधुदुर्ग सर्वप्रथम कोरोनामुक्त करा : मुख्यमंत्री ठाकरे

दरम्यान हा पुरस्कार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या दालनात ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायत कुशेवाडा सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या हस्ते स्वीकारणार आहेत. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.अध्यक्ष, सभापती वेंगुर्ले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (स्वच्छता), गटविकास अधिकारी वेंगुर्ले उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com