कामगार बांधवांच्या पाठींब्यामुळेच मंत्रिपदापर्यंत मजल

कामगार बांधवांच्या पाठींब्यामुळेच मंत्रिपदापर्यंत मजल

सावंतवाडी - आपण मंत्रिपदापर्यंत पोचण्यामागे फक्त कामगार बांधवांचा हात आहे. आपला लढा कामगारांच्या प्रश्‍नांसाठी कायम झटत राहणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांसाठी जेवढ्या निधीची गरज लागेल, तेवढी तातडीने आपण उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही भाजपचे कामगार राज्यमंत्री संजय भेंगडे यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात दिली. 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ आणि सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या वतीने नोंदीतील कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्‍यक संच वाटप कार्यक्रम आज येथील बॅ. नाथ पै. सभागृहात झाला. यावेळी व्यासपीठावर प्रदेश कार्यालय सचिव शरद चव्हाण, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली, पालिकेच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, पंचयत समिती सदस्य शीतल राऊळ, बाबू कविटकर, भाजप शहराध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, किरण गुगल, राजन टेंबुलकर, सहायक कामगार अधिकारी विश्वास जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. भेंगडे म्हणाले, ""आपल्या दौऱ्याची सुरुवात आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करायला मिळाली, हे आपले भाग्य आहे. कामगारांची विशेष मोहिमेआधारे नोंदणी करण्याचे काम सुरू असून येत्या 14 ऑगस्टपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी नोंदणी करावी. कोकणवासियांनी आजपर्यंत आपला स्वाभिमान टिकवून ठेवला आहे. येथील माणूस कोणाजवळही कुठची गोष्ट दिन होऊन मागणार नाही हे येथील वैशिष्ट्य आहे. आता भारतीय जनता पार्टी हे सरकार आपले आहे. त्यामुळे हे सरकार तुम्ही नाही मागितला तरीही आता तुम्हाला भरभरून देण्यासाठी सत्तेत आले आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेतल्याशिवाय वंचित राहू नका.''

ते म्हणाले, ""माझ्या कामगार बांधवांसाठी सुरक्षेची हमी म्हणून किट देण्यात येते तसेच अपघात किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला तसेच वारसाला शासनाकडून मदतही मिळते. मुलांच्या शिक्षणाचा खर्चही राज्य सरकार करते. त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्यात मजुराचा मुलगा हा मजूर राहणार नाही, तर तोही पुढे उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होईल. सरकारी योजना कागदावरच मर्यादित राहिल्या, तर त्याचा उपयोग होणार नाही. या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविले पाहिजेत. जिल्ह्याला जेवढ्या निधीची गरज लागेल तेवढा निधी आपण देऊ. ज्या कामगारांना घरे नाहीत त्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्थेकडे मागणी करा. अशा बेघर कामगारांना आपण नोंदणीस एक वर्ष झाल्यानंतर घरकुल योजनेतून घरे उपलब्ध करून देऊ.मालीका लोगा  धगधगते अरूणा खोरे, भाग- 1 हे सरकार तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला जे हवे ते दिल्याशिवाय आपण फक्त बसणार नाही. कामगराचा एकही मुलगा योजनेपासून वंचित राहणार नाही.'' 

यावेळी श्री. तेली म्हणले, ""आज योजना तळागाळात पोचत नाही. कामगारांची नोंदणी कमी आहे, ही खंत आणि वस्तुस्थिती आहे. 14 ऑगस्टपर्यंत नवीन कामगारांची नोंदणी व्हायला हवी असा निर्धार करूया. येत्या काळात 3.50 कोटी रुपये कामगारांच्या मुलांसाठी येणार आहेत.'' 

सौ. कोरगावकर म्हणाल्या, ""देशाची निर्मिती कामगारांच्या जोरावर होते. आयुष्यमान योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली आहे. त्याच कार्ड घेणे गरजेचे आहे. योजनेबाबत जागरूकता होणे गरजेचे आहे.''  सहायक कामगार अधिकारी विश्‍वास जाधव यांनी प्रास्ताविक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com