कोटा पॅटर्नचा भुलभुलय्या भाग १

कोटा पॅटर्नचा भुलभुलय्या भाग १

पान ५ साठी

२३ मालिका

लोगो......... कोटा पॅटर्नचा भुलभुलय्या भाग १

यशामागे एक आत्महत्येची काळी गडद किनार

स्वप्नांचे शहर कोटा ; भविष्यात आकडे वाढण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६: गेल्या १२ वर्षात कोटा पॅटर्नच्या हव्यासाने १८१ मुलांचा बळी घेतला आहे. यावर्षी २८ एप्रिलच्या एका मुलाच्या मृत्यूबरोबरच २०२४ च्या पहिल्या चार महिन्यांत कोटामधील आत्महत्येची नववी बातमी आली आहे. गेल्या १२ वर्षात १८१ विद्यार्थी कोटा पॅटर्नच्या हव्यासाचे बळी ठरले आहेत. इंजिनीअर बनवण्याच्या जेईई परीक्षेचा निकालही लागला. तेव्हाही यशस्वी विद्यार्थ्यांची छायाचित्रे वर्तमानपत्र आणि टीव्हीवर झळकली होती. मात्र या यशामागे एक आत्महत्येची काळी गडद किनार देखिल आहे.
स्वप्नांचे शहर कोटा मृत बालपणीच्या किंमतीवर उभे हे पालक लक्षात घेत नाही. ज्याचे बालपण कवडीमोल किमतीत विकले जाते आणि स्वतःच्या अटींवर डॉक्टर आणि इंजिनिअर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून लाखो विद्यार्थी कोटात जातात. अशा स्वप्नांना शाश्वती नसते. पण निरागस मुलांना यशस्वी जीवन देण्याच्या आशाआकांक्षेपोटी अनेक पालक कोणतीही हमी न घेता हे स्वप्न विकत घेण्याची केवळ स्पर्धाच लावत नाहीत, तर जाणून-बुजून आपल्या मुलांना यशस्वी जीवनाऐवजी कोटा पॅटर्नसारख्या भुलभुलय्याकडे ढकलत आहेत. जीवन ही एक परीक्षा आहे यात शंका नाही, पण कोटासारख्या पॅटर्नने जीवनाची परीक्षा आयुष्याच्या डावावर लावली, तर भविष्यात हे आकडे कमी होण्याऐवजी वाढतच जातील हे विदारक सत्य आहे.
(क्रमश:)
---------------------------
कोट
न्यायमूर्ती संजीव खन्नाच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ निष्कर्ष काढतात, ‘दोष कोचिंग क्लासचा नसून पालकांच्या अवास्तव अपेक्षांच्या ओझ्याचा आहे’. १६ ते १८ वर्षांची मुले कोटा पॅटर्नसाठी पोहोचल्यानंतर परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने एवढे मोठे पाऊल का उचलतात? ज्यांनी जीवनसंघर्षही पाहिलेला नाही, ते निरागस बालपणातच मृत्यूचे मार्ग का कवटाळतात? यशस्वी आयुष्याचा व्यवसाय फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर नसतो. जागतिक बँकेच्या २०२० च्या अहवालानुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ ०.७ टक्केच लोक डॉक्टर आणि इंजिनियर आहेत. डॉक्टर आणि अभियंता यांच्या व्यतिरिक्त इतर शेकडो व्यवसाय आहेत, जे आनंदी जीवनाच्या मार्गाने जातात.
ॲड. विलास पाटणे, रत्नागिरी
-----------------------------
चौकट १
वर्ष व आत्महत्या करणाऱ्या मुलांची संख्या या क्रमाने- २०१२- ११, २०१३- १३, २०१४- ०८, २०१५- १७, २०१६- १८, २०१७- १४, २०१८- २०, २०१९- १८
२०२०- ०४, २०२१- कोरोना, २०२२- कोरोना, २०२ - १५, २०२४ आतापर्यंत ८.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com