

Ladghar Beach in Dapoli, Ratnagiri, earns the prestigious International Blue Flag certification for the 2026–27 season, along with Guhagar and Shrivardhan beaches in Maharashtra.
esakal
दापोली : कोकणच्या निसर्गसौंदर्याला आता आंतरराष्ट्रीय दर्जाची मोहोर उमटली आहे. दापोली तालुक्यातील प्रसिद्ध लाडघर समुद्रकिनाऱ्याने २०२६-२७ या हंगामासाठी प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार पटकावला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच हा जागतिक बहुमान मिळाला असून, लाडघरसह रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या किनाऱ्यांचाही गौरव झाला आहे. या यशामुळे दापोलीच्या पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.