रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki Bahin Yojana) आता सरकारच्या तिजोरीवर ताण देणारी ठरत आहे. अनेक विकासकामांना कात्री लावण्याची वेळ येऊ लागल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू झाली. छाननीमध्ये जिल्ह्यातील ७ हजार ७५३ बहिणी अपात्र ठरल्या आहेत. मार्चपासून या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सरकारचे एक कोटी १६ लाख २९ हजार ५०० रुपये वाचणार आहेत.