दापोलीसारख्या भागात एका मोठ्या उद्योगपतीने शेकडो एकर जमीन आधीच सात-बाऱ्यावर चढवून घेतली आहे. या शिवाय मंडणगडमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत.
चिपळूण : रिअल इस्टेट (Real Estate) दलालांची रत्नागिरी, सिंधुदुर्गवर वक्रदृष्टी पडली आहे. यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर उतारापासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंतच्या अनेक जमिनी कवडीमोल भावाने विकण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील अनेकजण भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील जमिनींची बहुतांश खरेदी-विक्री झाल्यानंतर दलालांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांकडे मोर्चा वळविला आहे.