चिपळूण तालुक्यात 'या' गावात 21 कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीसा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 August 2019

चिपळूण - तालुक्‍यातील तिवडी मोरेवाडी येथील डोंगर खचला आहे. परिणामी येथील 21 कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. भूवैज्ञानिक रश्‍मी कदम यांनी या घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर येथील 21 कुटुंबांना नोटीसा देण्यात आल्या असून तातडीने स्थलांतर करण्याची सूचना महसूल विभागाकडून केली आहे. 

गेले महिनाभर तालुक्‍यासह दसपटी भागात मुसळधार पाऊस सुरू होता.परिणामी तालुक्‍यात डोंगर खचण्याच्या व भूस्खलन होण्याच्या घटना याच भागात घडल्या आहेत. दसपटीत कोयना अभयारण्यास लागून असलेल्या तिवडी, नांदीवसे, ओवळी, स्वयंदेव, इंदापूर, तिवरे गावात डोंगराना भेगा पडण्याच्या घटना घडल्या. तिवडी मोरेवाडी येथील डोंगरास पडलेल्या भेगा रुंदावत आहेत. त्यामुळे डोंगराखालील लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी भूवैज्ञानिक रश्‍मी कदम यांना घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले.

कदम यांनी तलाठी नागरगोजे, माजी सरपंच प्रकाश पवार व ग्रामस्थांनी भेगा पडलेल्या डोंगराची पाहणी केली. भेगा गेलेल्या डोंगराची सध्यस्थिती लक्षात घेऊन मोरेवाडीतील 21 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी सूचना भूवैज्ञानिक कदम यांनी केली. त्यानुसार तलाठी नागरगोजे यांनी 21 कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. भेगा पडलेल्या डोंगराचा अहवाल दोन दिवसात सादर केला जाणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्‍मी कदम यांनी सांगितल्याची माहिती माजी सरपंच पवार, तलाठी नागरगोजे यांनी दिली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land slice in Chiplun Taluka in Tivadi Morewadi