esakal | राजापूर : मूर खिंडीत कोसळली दरड
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर : मूर खिंडीत कोसळली दरड

राजापूर - तालुक्यातून मुसळधार पावसामुळे पाचल - तळवडे - मुर रस्त्यावर काल रात्री दरड कोसळली. यामुळे  भुईबावडा - गगनबावडा मार्गे कोल्हापूरला जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या दरड हटवण्याचे काम सुरू असून एकेरी वाहतूक सुरू करण्यात प्रशासनास यश आले आहे.

राजापूर : मूर खिंडीत कोसळली दरड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर - तालुक्यातून मुसळधार पावसामुळे पाचल - तळवडे - मुर रस्त्यावर काल रात्री दरड कोसळली. यामुळे मूर परिसरातील सात गावांचा संपर्क तुटला होता. सध्या दरड हटवण्याचे काम सुरू असून एकेरी वाहतूक सुरू करण्यात प्रशासनास यश आले आहे.

 गेल्या दोन दिवसापासून तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामध्ये राजापुरात अर्जुन आणि कोडवली नद्यांना पूर येऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच अतिवृष्टीमध्ये मुर खिंड येथे काल रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. मुरखिंड येथून पुढे भुईबावडा - गगनबावडा असा कोल्हापूरला जाण्याचा मार्ग आहे. मात्र, मुरखिंड येथे दरड कोसळल्याने या मार्गाने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.

मुरखिंड येथून पुढे तालुक्यातील वाळवड, सावडाव, कोळब, काजीरडा, हातादे, आजीवली, जवलेथर या गावांना या रस्त्याने पाचल परिसराशी जोडले गेले आहे. मात्र दरड कोसळल्याने या गावांचाही संपर्क तुटला होता.

दरम्यान, या घटनेची माहिती तहसीलदार श्रीमती प्रतिभा वराळे याना समजताच त्यांनी तातडीनर सकाळी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यासह पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मुरचे सरपंच संजय सुतार यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तहसीलदार श्रीमती वराळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि बांधकाम विभागाचे कनिष्ट अभियंता श्री बावधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर दुपारपर्यंत या मार्गावरील एकेरी वाहतूक सुरू झाल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील कोदवली आणि अर्जुना नद्यांना पूर आला आहे. अर्जुना नदीच्या पुरात शांताराम बाबुराव साळवी (८०, रा.मुर) वाहून गेले आहेत. 

loading image
go to top