सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 September 2019

दरम्यान, आज पहाटे पुन्हा गगनबावड्यापासुन दीड किलोमीटर अतंरावर पुन्हा दरड कोसळली. दगड मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला आहे. या ढिगाऱ्यांने पूर्ण रस्ता व्यापला आहे. 

वैभववाडी : भुईबावडा घाटात आज (ता. 4) पहाटे दरड कोसळली. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतुक करूळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान या घाटात दरड कोसळण्याची आठवड्यातील दुसरी घटना आहे.

तालुक्यात रविवारपासुन मुसळधार पाऊस सुरू आहे. घाट परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. या पावसामुळे दोन दिवसांपुर्वी दरड कोसळली होती. दरम्यान, आज पहाटे पुन्हा गगनबावड्यापासुन दीड किलोमीटर अतंरावर पुन्हा दरड कोसळली. दगड मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला आहे. या ढिगाऱ्यांने पूर्ण रस्ता व्यापला आहे. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. भुईबावड्याकडुन गगनबावड्याच्या दिशेने निघालेल्या वाहनांना माघारी परतावे लागले.

या मार्गावरील वाहतुक सध्या उंबर्डे, एडगावमार्गे करूळ घाटातून वळविण्यात आली आहे. दरड मोठी असल्यामुळे हटविण्यास विलंब लागणार आहे. दरड कोसळल्याची माहीती बांधकाम विभागाला मिळाली असून दरड हटविण्याच्या दृष्टीने जेसीबी आणि इतर जुळवाजुळव सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: landslide at Bhuibawda ghat near VaibhavWadi